Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजArvind Kejriwal : दिल्लीत राजकीय भूकंप! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार… पुढील...

Arvind Kejriwal : दिल्लीत राजकीय भूकंप! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार… पुढील CM कोण?

दिल्ली | Delhi

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून ते पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीसह देशातील वातावरण ढवळून निघालं आहे.

केजरीवाल म्हणाले, पुढील दोन दिवसात मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर बसणार नाही. जोपर्यंत जनता म्हणत नाही केजरीवाल प्रामाणिक आहे, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. येत्या दोन दिवसांत विधीमंडळाची पक्षाची बैठक होईन, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

हे ही वाचा : उमेदवारीची ‘माळ’ की हाती ‘टाळ’ याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष

दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने त्यांच्यावर अनेक बंधने देखील घातली आहेत.

मुख्यमंत्री म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित प्रस्तावाला नायब राज्यपालांकडून मंजुरी घेण्याची अट घातली होती. याशिवाय, केजरीवाल यांना दिल्लीतील सचिवालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! Youtube वर पाहून ऑपरेशन केलं, मुलाने गमावला जीव… ‘मुन्नाभाई डॉक्टर’ला अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या