Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक

आज संध्याकाळ पासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले होते. दोन तासांच्या चौकशी नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत केजरीवालांना ईडीने चौकशीसाठी नऊ समन्स पाठवले, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होता. मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यानी त्यांच्या निवास स्थान बाहेर गर्दी केली आहे.

- Advertisement -

केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल होत कारवाई केली आहे. दरम्यान अटक झाल्याने दिल्ली मद्य धोरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या