Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच! २ जूनला आत्मसमर्पण करावे लागणार

अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच! २ जूनला आत्मसमर्पण करावे लागणार

दिल्ली । Delhi

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना धक्का दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन (interim bail) वाढून द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी न्यायालयापुढे आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय कारणांमुळे जामिनाची मुदत ७ दिवसांसाठी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. गेल्या काही दिवसांत आपलं वजन ७ किलोनी कमी झाले आहे. डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगितल्या आहेत. त्यासाठी जामिनाची मुदत ७ दिवसांसाठी वाढवून मिळावी, असे केजरीवाल यांनी याचिकेत म्हटलं होते पण त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. (Arvind Kejriwal interim bail Supreme Court)

दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी ९ समन्स पाठवले होते. मात्र केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. १० मे रोजी अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. त्यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या पीठाने अंतरिम जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

0
रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol राहाता (Rahata) तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Minor Girl Death) झाला...