Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशउद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार…; केजरीवाल यांचा भाजपला इशारा

उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार…; केजरीवाल यांचा भाजपला इशारा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आपचे संयोजक नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयासमोर उद्या (रविवारी) ‘जेल भरो’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत चांगले काम केले, त्यांना ते जमत नाही म्हणूनच भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की, ते एकामागून एक आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, तुम्ही हा ‘जेल का खेल’ खेळत आहात. उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदारांसह दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्ही ज्याला पाहिजे त्याला तुरुंगात टाकू शकता.”

- Advertisement -

आम आदमी पक्षाने चांगलं काम केलं म्हणून भारतीय जनता पक्ष आम्हाला त्रास देत आहे. एकेकाला जेलमध्ये टाकलं जात आहे. त्याऐवजी लोकांची कामे होऊ नयेत, त्यांना चांगल्या सुविधा मिळू नयेत, चांगल्या शाळा आरोग्य सुविधा यापासून ते वंचित राहावेत असे वाटत असेल तर आम्हाला सगळ्यांना एकदाच अटक करा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

पुढे ते असे ही म्हणाले, त्यांनी मला तुरुंगात टाकले, मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकले. आज माझ्या पीएला देखील तुरुंगात टाकले. आता ते राघव चढ्ढा जे नुकतेच लंडनवरुन परतलेत त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्याचे कळतेय”

तुम्हाला वाटतंय की, असं करुन तुम्ही आम आदमी पार्टीला चिरडून टाकाल पण अशा प्रकारे आम आदमी पार्टी संपणार नाही. एकदा तुम्ही सर्वांना तुरुंगात टाकून तर बघा. आम आदमी पार्टी हा विचार आहे जो संपूर्ण देशभरात लोकांच्या हृदयात पोहोचला आहे. जितक्या आपच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकाल तितके शेकडो नेते हा देश तयार करेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या