Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा!

अरविंद केजरीवालांना ‘सर्वोच्च’ दिलासा!

दिल्ली । Delhi

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

न्या. संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं आज (शुक्रवार) हा निर्णय दिला.दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती.

त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. देशात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. ही आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू आहे. अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या