Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याArvind Kejriwal : सीबीआयकडून केजरीवालांना समन्स; 'त्या' घोटाळ्याची होणार चौकशी

Arvind Kejriwal : सीबीआयकडून केजरीवालांना समन्स; ‘त्या’ घोटाळ्याची होणार चौकशी

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरण घोटाळा (Excise Policy Scam) प्रकरणाची चौकशी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालपर्यंत जाऊन पोहोचली आहे. या संदर्भात सीबीआयने (CBI) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स पाठवले असून १६ तारखेला अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीला बोलावल्याची माहिती आहे.

- Advertisement -

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्विट केले आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आता केजरीवाल यांच्या अडचणींमध्येही वाढ होणार असल्याचं दिसतंय.

Video : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी पिकअपला सिनेस्टाईल पकडलं अन् समोर आला ‘हा’ धक्कादायक प्रकार…

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मद्य धोरणातील घोटाळ्यातील आरोपींशी संवाद साधल्याचा आरोप आहे. यासोबतच केजरीवाल यांनी मद्य व्यापाऱ्यांना दिल्लीत येऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्याबाबत अनेक पुरावे गोळा करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात ४८ पैकी ४० जागा जिंकू, २०२४ ला सत्तापरिवर्तन होणार – संजय राऊत

काय आहे प्रकरण?

दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली ‘लीक’ करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. याच प्रकरणी सिसोदिया अटकेत आहेत. आता अरविंद केजरीवाल यांनाही याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या