Sunday, May 12, 2024
Homeब्रेकिंग न्यूजऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

दिल्ली । Delhi

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशातच ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Delhi Congress News)

- Advertisement -

काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष (Delhi Congress president) अरविंद सिंग लवली (Arvinder Singh Lovely) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सिंग लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. अरविंदर सिंह लवली यांनी मल्लिकार्जून खरगे यांना लिहलेल्या पत्रात राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे.

त्यात त्यांनी म्हंटल आहे की, काँग्रेसवर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्या एकमेव आधारावर स्थापन झालेल्या पक्षासोबत आघाडी करण्याच्या विरोधात दिल्ली काँग्रेस युनिट होती. असे असतानाही पक्षाने दिल्लीत ‘आप’सोबत (Aam Aadmi Party (AAP)) आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, लवली यांनी स्वतःला काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर, दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी काँग्रसचे आभार व्यक्त करत गेल्या सात आठ महिन्यात दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, जेणेकरून पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा, असे अरविंदर सिंग लवली यांनी पत्रात म्हटले आहे. (Delhi Congress Chief Resigns, Cites Rift With Party Leader, AAP Alliance)

- Advertisment -

ताज्या बातम्या