मुंबई | Mumbai
क्रूझ ड्रग्स प्रकरणी (Cruise Drugs Case) अटकेत असणारा बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे.
- Advertisement -
जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी आर्यन खानला (Aryan Khan Bail) जामीन मिळालेला नसून वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळला जात आहे. काल त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल की मग पुन्हा जेल याचा फैसला न्यायालय सुनावणार आहे.