Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनआर्यन खानची अखेर सुटका; २६ दिवसांनंतर कारागृहातून सुटका

आर्यन खानची अखेर सुटका; २६ दिवसांनंतर कारागृहातून सुटका

मुंबई | Mumbai

मुंबई ड्रग्ज प्रकरणी (drug case) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे.

- Advertisement -

न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला.

शाहरुख खान सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं आहे. मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. आर्यनच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून घोषणाही देण्यात येत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मंत्रिमंडळ बैठकीसाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चोंडी (ता. जामखेड) या ठिकाणी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तयारी प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. येत्या 6 मे रोजी ही बैठक होणार असल्याचे प्रस्तावित...