Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनी एकाच दिवशी तीन परिक्षा कशा द्याव्या?; सत्यजित तांबेंची परीक्षेची तारीख बदलण्याची...

विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी तीन परिक्षा कशा द्याव्या?; सत्यजित तांबेंची परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (MPSC Exams) प्रशिक्षणासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी (Students Are In Big Confusion) संभ्रमात आहे. यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अखत्यारितल्या परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी केली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरती परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे.

यंदाचा ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार २०२३’ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर

राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण-तरुणी एकाच वेळी विविध परीक्षांसाठी अर्ज करत असतात. मात्र या तीनही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एकाच वेळी या तीन परीक्षा कशा देणार, हा प्रश्न या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. MPSC-UPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत असतात. अशा वेळी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या परीक्षा ठेवल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.

“आता ही शेवटची संधी”, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांवर पुन्हा ताशेरे; दिले ‘हे’ निर्देश!

ज्यभरात पेपरफुटीचा मोठा घोळ सुरू असतानाच एकीकडे तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जात असतील. तर हा परीक्षार्थींचा मोठा अपमान आहे. उमेदवारांनी परीक्षेची तयारी कशी करावी? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. जर अशा पद्धतीने परीक्षांमध्ये घोळ सुरू राहिले, तर नवीन बेरोजगारांची वाढ होऊ शकते. याकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तसेच तरुणांचे भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही तांबे यांनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या