Saturday, May 18, 2024
Homeजळगावतब्बल 19 जबरी चोरी करणारे दोघ गजाआड

तब्बल 19 जबरी चोरी करणारे दोघ गजाआड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पाच वर्षांपासून शहरातील विविध भागात (various areas) जबरी चोरी (forced theft) करुन मुद्देमाल लांबविणार्‍या (Protractors) दोघांच्या दत्तात्रय अमृत बागुल (वय- 39, रा. मोहाडी जि. धुळे ह.मु. जळगाव) आणि सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (वय-25, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) दोघ चोरट्यांना (Two thieves) रामानंद नगर पोलिसांनी (Ramanand Nagar Police) गजाआड (arrested) केले. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील तब्बल 26 तोळे सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

सन 2018 पासून जबरी चोरीचे करणारा सराईत चोरटा दत्तात्रय बागुल आणि त्याचा साथीदार सुधाकर उर्फ जितेंद्र महाजन या दोघांना रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शहरात तब्बल 19 जबरी चोरी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले 15 गुन्हे तसेच जिल्हापेठ पोलीस हद्दीतील 2 तर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील 2 असे एकूण 19 जबरी चोरी व चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश होता. या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पोलीसांनी 26 तोळे सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

वृद्ध महिलांना करीत होते टार्गेट

पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघ चोरटे हे वृद्ध महिलांना पत्ता विचारण्याच्या कारणावरुन त्यांच्यांशी संवाद साधत होते. तसेच संधी मिळताच ते वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत लांबवून पसार होत होते. सर्वाधिक जबरी चोर्‍यांमध्ये त्यांनी वृद्ध महिलांना टार्गेट केल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या पथकाची कामगिरी

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोना रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रवीण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोनवणे आणि दीपक वंजारी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या