Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : सिंहस्थासाठी हवा तेवढा निधी

Nashik Political : सिंहस्थासाठी हवा तेवढा निधी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तुम्हाला काम करणारे आमदार हवेत? असा परखड सवाल उपमुख्यमंत्री देेवेंंद्र फडणवीस यांंनी नाशिककरांना करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांंवर चांगलेच तोंडसुख घेतले. गेल्या सिंहस्थात तीन हजार कोटींचा निधी नाशिकला दिला होता. येत्या सिंहस्थासाठी हवा तेेवढा निधी दिला जाईल. मात्र, त्यासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन त्यांंनी जाहीर सभेत केले.

- Advertisement -

नाशिकमधील महायुतीचे उमेदवार देेवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज आहिरे यांच्यासाठी आज येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशातील सर्वोत्तम कुंभमेळा झाला पाहिजे. त्यासाठी हवा तेेवढा निधी देण्याची तयारी आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांंनी अडीच वर्षाच्या काळात त्यांनी केलेले एकतरी भव्य काम दाखवून द्यावे, असे आव्हान दिले. आगामी काळात नाशिकला आयटी पार्क उभा राहिलेला दिसेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

गेल्या अडीच वर्षात नाशिकमध्ये पाचशे कोटींची कामे झाली आहेत. सिडको फ्री होल्ड झालेे आहे. तपोवनात श्रीरामांची भव्यमूर्ती उभारल्यापासून पर्यटन वाढले आहे. भविष्यात नाशिकला विकासाची गंंगा अशीच वाहण्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही, असेही फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या वोट जिहादबाबतची ध्वनिचित्रफित त्यांनी दाखवत वोट जिहादविरुध्द आता धर्मयुध्द सुरू आहे. यंदाची निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे. तुमचे अस्तित्व मतपेटीतून दाखवा, असे भावनिक आवाहन फडणवीस यांनी नाशिककरांना केले.

विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिलावर्गाला सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचा केंद्रबिंदू करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. त्यासाठी मोदी सरकारने महिलांसाठी ङ्गबेटी बचाव, बेटी पढाओफपासून लखपती दीदीपर्यंत 14 विविध योजना आणल्या. 2028 पर्यंत राज्यात 50 लाख लखपती दीदी तयार करायच्या आहेत. त्यातील 25 हजार लखपती दीदी डॉ. तुषार राठोड तयार करतील. राज्यातील महायुती सरकारनेही मुलींसाठी शिक्षणासाठी, महिलांसाठी लाडकी बहीण, पन्नास टक्के दरात एसटी प्रवास अशा अनेक योजना आणल्या आहेत. अडीच कोटी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा केले आहेत. पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका अशा प्रत्येक घटकाचे मानधन वाढवून दिले आहेत, असे सांगत फडणवीस यांनी योजनांचा पाढा वाचाला

व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजाय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष प्रशांंत जाधव, नाना शिलेदार, पवन भगूरकर, आशिष नहार, सुरेश पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संंख्येने उपस्थित होते. अजित चव्हाण, प्रकाश लोंढे, गिरीश पालवे तसेच उंमेदवार ढिकले, फरांदे, हिरे यांंचीही भााषण झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...