Tuesday, April 29, 2025
HomeमनोरंजनBharat Jodo Yatra बाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत; नेटिझन्स विचारताय 'हा' प्रश्न

Bharat Jodo Yatra बाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत; नेटिझन्स विचारताय ‘हा’ प्रश्न

मुंबई | Mumbai

कांग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo) Yatra) महाराष्ट्रातील आजचा सातवा दिवस आहे या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

- Advertisement -

यामध्ये लाखोंच्या संख्येने सामान्य नागरिक, विविध पक्षांचे नेते सहभागी होत आहेत. अशातच कॉँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने ‘भारत जोडो यात्रेचा’ एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून रितेशला अभिमान वाटला. त्याने भावूक होत चक्क हा फोटो ट्वीट केला आहे.

रितेशने हा फोटो ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक नेटकऱ्याने त्याच्या ट्विटवर कमेंट करत विचारले आहे की, ‘तुम्ही भारत जोडो यात्रा’मध्ये कधी सहभागी होणार?.. तुम्ही या यात्रेमध्ये दिसत नाही.. तर अनेकांनी ‘तुम्हीही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हा’ असं त्याला सुचवलं आहे. तर काहींनी विलासराव देशमुख तुम्ही नेहमीच आठवणीत राहाल, असं म्हटलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना चोख उत्तर देणार – पंतप्रधान नरेंद्र...

0
  दिल्ली | प्रतिनिधी  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार कठोर कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि अटारी-वाघा सीमा बंद करणे यासारखी पावले पाकिस्तानविरुद्ध...