Thursday, May 8, 2025
Homeनगरगावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पळाले

गावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पळाले

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील नांदुरी दुमाला (Nanduri Dumala) येथे सोमवार (ता.28) ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजेनंतर एका शेतकर्‍याच्या शेतातील ठिबक संचाचे पाईप चोरुन (Drip Set Pipe Theft) पिकअपमधून अज्ञात चोरटे घेऊन जात होते. सदर प्रकार गावकर्‍यांना समजताच त्यांचा पाठलाग केला असता चोरटे साहित्यासह पिकअप सोडून पळून गेले आहे.

- Advertisement -

पाणलोटात पाऊस, मात्र लाभक्षेत्र कोरडे

नांदुरी दुमाला येथील शेतकरी मुरलीधर महादू साबळे यांच्या घरासमोरील शेतात ठिबक संचाचे साहित्य होते. सोमवारी मध्यरात्री एक वाजेनंतर सदर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन पिकअप (Pickup) (क्र.एमएच. 17 बीवाय 7044) मध्ये भरले. त्यानंतर ते घेऊन जात असताना हा प्रकार काही गावकर्‍यांच्या लक्षात आला. त्यानंतर गावकर्‍यांनी पिकअपचा (Pickup) पाठलाग सुरू केला.

बळीराजावरील संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे!

शेवटी चोरट्यांनी (Theft) साहित्यासह पिकअप सोडून पळ काढला. याप्रकरणी शेतकरी मुरलीधर साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर. 599/2023 भारतीय दंड संहिता कलम 379, 511, 34 प्रमाणे दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उगले हे करत आहे.

शासनाने सरसकट, पूर्ण कांदा अनुदान जमा करावे – आ. गडाखश्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकास पकडले

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारताच्या १५ शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न; S...

0
नवी दिल्ली | New Delhi भारताने (India) बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात (Pakistan) घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त...