Wednesday, June 19, 2024
Homeशब्दगंधदेदीप्यमान यशाच्या ‘चंद्र’कला

देदीप्यमान यशाच्या ‘चंद्र’कला

-डॉ.संजय वर्मा, साहाय्यक प्राध्यापक, बेनेट युनिव्हर्सिटी

- Advertisement -

एकविसावे शतक सुरू होताच जगात चंद्र-शर्यतीची नवी मालिका सुरू झाली. याचे एक श्रेय भारताला देता येईल. कारण ऑक्टोबर 2008 मध्ये प्रथमच भारताचे चांद्रयान-1 प्रक्षेपित झाले आणि चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या यानाने अशी अनेक निरीक्षणे दिली, ज्यामुळे चंद्राला पुन्हा गवसणी घालण्याच्या जगाच्या आकांक्षा जागृत झाल्या. भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेचे यश हे चिरंतन आहे.

रूपेरी चंद्राला स्पर्श करण्याची इच्छा मानव समूहामध्ये शतकानुशतके आहे. अवकाशाच्या चार भिंती ओलांडून चंद्राला स्पर्श करता येतो हे लक्षात आल्यावर विज्ञान आणि अवकाशाशी संबंधित माहितीने या आकांक्षांना नवे पंख दिले. त्याच्यापर्यंत वाहने पोहोचवता येतात, माणसांना त्याच्या भूमीवर उतरवता येते यांसारख्या भन्नाट आणि अशक्यप्राय वाटणार्‍या संकल्पना मानवी मेंदूतून बाहेर येऊ लागल्या. अवकाश संशोधकांनी, वैज्ञानिकांनी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड दिली आणि ही दोन्ही उद्दिष्टे सुमारे साडेपाच दशकांपूर्वीच साध्य झाली. 20 जुलै 1969 पासून अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाच्या अंतराळवीरांनी चंद्रावर उतरण्याची जी मालिका सुरू केली होती, सहा यशस्वी अपोलो मोहिमांमध्ये एकूण 12 प्रवाशांना चंद्रावर उतरवून संपुष्टात आली होती. या मोहिमांमुळे चंद्राविषयी आणखी काही जाणून घेण्याची इच्छा राहिलेली नव्हती. तसेच शास्त्रज्ञांना किंवा प्रवाशांना पुन्हा चंद्रावर जाऊन नव्याने संशोधन करण्याविषयीचे प्रयत्नही थंडावले होते. पण एकविसावे शतक सुरू होताच जगात चंद्र-शर्यतीची नवी मालिका सुरू झाली. याचे एक श्रेय भारताला देता येईल. कारण ऑक्टोबर 2008 मध्ये प्रथमच भारताचे ‘चांद्रयान-1’ प्रक्षेपित झाले आणि चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या यानाने अशी अनेक निरीक्षणे दिली, ज्यामुळे चंद्राला पुन्हा गवसणी घालण्याच्या जगाच्या आकांक्षा जागृत झाल्या. आता दुसर्‍यांदा भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले आहे. हे एक ऐतिहासिक आणि देदीप्यमान यश आहे, पण त्याचवेळी चंद्रावरून आपल्याला खरोखर काही नवीन मिळणार आहे का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

अलीकडच्या वर्षांत केवळ भारतच नाही तर शेजारील चीन, जपान, इस्रायलसह अनेक देशांनी चंद्राला गवसणी घालण्यासाठी आपल्या अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत तसेच अनेक देश यासाठीच्या तयारीत गुंतलेले आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार 2024 किंवा 2025 मध्ये तीन प्रवासी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकतात. आज भारताच्या ‘चांद्रयान-3’ ने जिथे पाऊल रोवले आहे तिथे म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी असणार्‍या रशियानेही आपले वाहन लुना-25 उतरवण्याचा प्रयत्न केला; 1976 नंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवण्याचा हा नवा प्रयत्न केला. या मोहिमेमागे रशियाची काही उद्दिष्ट्ये होती. त्यापैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे या मोहिमेमधून रशियाला हे सिद्ध करायचे होते की, युक्रेनसोबत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या युद्धानंतरही रशिया कुठेही कमजोर झालेला नाहीये. पण आंतरराष्ट्रीय समुदायाला कोणताही सकारात्मक संदेश देण्यात रशिया अपयशी ठरला. 20 ऑगस्ट 2023 रोजी रशियाचे वाहन अपघातग्रस्त झाले आणि चंद्रावर उतरण्याचे रशियाचे स्वप्न भंगले. भारतालाही 2019 मध्ये चंद्राशी संबंधित योजनेमध्ये एक धक्का बसला होता. सप्टेंबर 2019 मध्ये पाठवलेले ‘चांद्रयान-2’ चे लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नव्हते. यामुळे हे मिशन अयशस्वी झाले. पण यामुळे भारताचा उत्साह कमी झाला नाही. चांद्रयान-2 च्या उद्दिष्टांच्या पुढे जात, त्यातील उणिवांचा, कमतरतांचा अभ्यास करत इस्रोने ‘चांद्रयान-3’ चे शिवधनुष्य पेलण्याचे ठरवले. ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगनंतर हे मिशन ‘चांद्रयान-2’ ची अपूर्ण कामेही पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे चंद्राशी संबंधित अनेक नव्या संशोधनांना आणि योजनांना चालना मिळेल. पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोलीय पिंड असणारा चांदोबा हा आज जागतिक आकर्षणाचे नवीन केंद्र बनलेला असताना इस्रोला मिळालेले हे यश अधिक महत्त्वाचे ठरते.

गेल्या पाच दशकांत असे काय घडले की ज्यामुळे चंद्राविषयीचे जगाचे आकर्षण वाढले? खरे तर जगातील वैज्ञानिकांचे डोळे आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लागले आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधारात नेहमी दिसणार्‍या खड्ड्यात (क्रेटर्समध्ये) पाणी साठलेले असू शकते. हे पाणी भविष्यात रॉकेट इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. असे मानले जाते की, चंद्राच्या या भागात आढळणारे पाणी सौरयंत्रणेच्या विविध भागांमध्ये पाठवलेल्या मोहिमांच्या रॉकेटसाठी इंधन पुरवण्याचे साधन बनू शकते. नासाच्या आकलनानुसार, चंद्रावर 600 दशलक्ष टन पाणी गोठलेल्या बर्फाच्या रूपात आहे. चंद्रावरील या पाण्याचे विघटन करून, त्यातून मिळणारा हायड्रोजन इतर ग्रहांवर जाणार्‍या रॉकेटसाठी इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यानुसार दूर अंतराळ प्रवासासाठी चंद्र हा थांबा म्हणून वापरला जाऊ शकतो आणि तेव्हा पाण्यापासून बनवलेले रॉकेट इंधन अधिक उपयुक्त ठरू शकते. पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेल्या रॉकेटची बहुतांश ऊर्जा या ग्रहाच्या वातावरणातून आणि गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी खर्च होते. अशा परिस्थितीत जर चंद्रावरील इंधन भरणारी केंद्रे (रिफ्युलिंग स्टेशन) सूर्यमालेतील इतर ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी अवकाशयानाच्या रॉकेटला इंधन पुरवू शकली तर हा करिश्मा अवकाश संशोधनाला आणि अवकाश मोहिमांना नवा आयाम देणारा ठरेल. भारताच्या चांद्रमोहिमेबरोबरच अन्य मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रचंड साठे आहेत, असे दिसून आले आहे. त्यामुळेच नासाने आता याच दक्षिण ध्रुवावर आर्टेमिस-3 वाहन उतरवण्याची योजना आखली आहे.

याशिवाय चंद्राची इतरही अनेक आकर्षणे आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहावर अशी अनेक दुर्मिळ खनिजे आहेत, ज्याचा वापर पृथ्वीवर झपाट्याने वाढला आहे. विशेषतः चंद्रावर हिलीयमचा मोठा साठा आहे. पृथ्वीच्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन याचा उपयोग केला जाऊ शकतो. इस्रोने हे मिशन अत्यंत कमी खर्चात यशस्वी करून दाखवले. चांद्रयान-3 साठीचा एकूण खर्च 615 कोटी म्हणजेच 75 दशलक्ष डॉलर्स इतका आहे. या देदीप्यमान विजयाने भारताची जागतिक कीर्ती कैकपटींनी वृद्धिंग

- Advertisment -

ताज्या बातम्या