Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआशा, गटप्रवर्तकांचे थकित मानधन मिळणार

आशा, गटप्रवर्तकांचे थकित मानधन मिळणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील आशा व गटप्रवर्तक Aasha Workers & Group Promoters यांचे एप्रिल 2021 पासून वाढविलेल्या मानधनाची थकित pending honorarium रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्राचे सहसंचालक महेश बोटले यांनी दिली.

- Advertisement -

आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात महेश बोटले यांच्यासोबत कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत आशासेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

सहसंचालक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांना आशा व गटप्रवर्तक यांना शासनाने करोना काळात मंजूर केलेला भत्ता अदा करण्यात यावा, एप्रिल 2021 पासून रखडलेले वाढीव मानधन लवकरात लवकर अदा करण्यात यावे.

जननी सुरक्षा योजनेचा कामाचा मोबदला मिळावा, आरोग्यसेविका पद भरतीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना 50 टक्के आरक्षण देण्यात यावे, आरोग्यवर्धनी अंतर्गत गटप्रर्वतकांचा समावेश नसताना त्यांच्याकडून कामे करुन घेतली जातात. त्याचा पंधराशे रुपयांचा लाभ त्यांना दिला जात नाही.

त्यामुळे आरोग्यवर्धनी अंतर्गत गटप्रर्वतक यांचा समावेश करावा, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये आशा कक्षाची स्थापना करण्यात यावी यासह अनेक प्रश्न सहसंचालक यांच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कृती समितीचे राजू देसले, एम. ए. पाटील, भगवानराव देशमुख, शंकर पुजारी, श्रीमंत घोडके, राजेश सिंग आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या