Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयAshadhi Ekadashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न; नाशिकच्या उगले दाम्पत्याला...

Ashadhi Ekadashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची महापूजा संपन्न; नाशिकच्या उगले दाम्पत्याला मिळाला मान

पंढरपूर | Pandharpur

आज (रविवार) आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. यावेळी मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दाम्पत्याला मान मिळाला.

- Advertisement -

आषाढी एकादशीनिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच पंढरपूरात दाखल झाले होते.यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासह केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री (CM) फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

YouTube video player

दरम्यान, यावेळी राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. विठूरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली होती. त्यानंतर सुमारे २० लाख भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. तर संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.

नाशिक जिल्ह्याला सलग दुसर्‍या वर्षी मिळाला महापूजेचा मान

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) जातेगाव येथील कैलास दामू उगले (५२) व कल्पना कैलास उगले या शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. गेली १२ वर्ष ते विठूरायाची सलग वारी करत असून, कैलास उगले हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. तर मागील वर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे (वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे (वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दाम्पत्याला मिळाला होता. त्यानंतर आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दांपत्यांला हा मान मिळाला आहे. तसेच २०२३ मध्येही कार्तिकी एकादशीला एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्याला मिळाला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंबीग ऑपरेशन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, त्याच अनुषंगाने मंगळवारी (6 जानेवारी) पहाटे शहर उपविभागात...