Sunday, October 4, 2026
HomeनगरShirdi : साई प्रसादालयात 43 हजार भाविकांना खिचडी महाप्रसादाचा लाभ

Shirdi : साई प्रसादालयात 43 हजार भाविकांना खिचडी महाप्रसादाचा लाभ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत विविध राज्यातून येणार्‍या भाविकांची मोठ्या प्रमाणात साई दर्शनासाठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाली. प्रसादलायत जवळपास शनिवारी 43 हजार भाविकांनी खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. एकादशी निमित्त शहरातून साईबाबांच्या पादुकांची सुवर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून आले.
आषाढ शुद्ध एकादशी हा दिवस साईबाबांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. साईबाबांनी त्यांचे परमभक्त दासगणू महाराज यांना भगवान विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिल्याची पावन परंपरा आहे.

- Advertisement -

बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाईत साजरा केला जात असे. त्याच परंपरेनुसार आजही हा उत्सव संस्थानतर्फे भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. यानिमित्त साईबाबांच्या समाधी चौथर्‍यावर भगवान विठ्ठलाची प्रतिमा विराजमान करण्यात आली. तसेच धूपारतीच्या वेळी विठ्ठलाची पारंपरिक मराठी आरती गायली जाईल. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. रात्री दिगंबर महाराज बोरसे राहाता यांचे कीर्तन झाले . रात्री साईबाबांच्या पादुकांची शिर्डी गावातून स्वर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध राज्यातून येणार्‍या साईभक्तांनी या पालखी सोळ्ययात सहभाग घेतला.

आषाढी एकादशीच्या महाप्रसादाचा अंदाजे 23 हजार भाविकांनी लाभ घेतला. तसेच 28 हजार 983 भाविकांना अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाच्या तयारीसाठी संस्थानतर्फे 60 पोते साबुदाणा, 45 पोते शेंगदाणे, 900 किलो शेंगदाणा तेल व सुमारे 2 हजार 500 किलो बटाटे तसेच इतर आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त साईबाबा संस्थानने भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करून धार्मिक वातावरणात उत्सव साजरा केला. हजारो साईभक्तांनी दर्शन, आरती, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.

शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा ही आरती साईबाबांच्या समकालीन भक्तांनी सुरू केली. यामागचे कारण साईबाबांचे भक्त दासगणू, काकासाहेब दीक्षित, गोळीबुवा, भागवंतराव शिरसागर आदी साईभक्तांना साईबाबांनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले तेव्हापासून साईबाबांचे भक्त साईबाबांमध्ये पांडुरंगाचे रूप बघतात. म्हणून आषाढी एकादशीला पंढरपूर प्रमाणेच शिर्डीला भाविकांची गर्दी होते.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...