Thursday, March 27, 2025
Homeमुख्य बातम्याAshish Deshmukh : फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश

Ashish Deshmukh : फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश

नागपूर | Nagpur

काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजप, काँग्रेस असा प्रवास केलेल्या देशमुख यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

आशिष देशमुख यांनी भाजप प्रवेशापुर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे.

राष्ट्रवादीत काय होतंय हे सर्वांना माहित, अजितदादांनी आमच्यासोबत यावं; मंत्री केसरकरांची खुली ऑफर

आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. ही टीका त्यांना चांगलीच महागात पडली होती. आशिष देशमुखांच्या टीकेनंतर त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. देशमुख यांची सहा वर्षांसाठी हकापट्टी करण्यात आली होती.

Ameesha Patel : अमिषा पटेलवर आली तोंड लपवण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं प्रकरण

त्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारण आशिष देशमुख भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज त्यांनी नागपुरात फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...