Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्या"जे मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी..."; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“जे मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी…”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

जे मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी या पलिकडे कधी गेले नाही आणि जे स्वत: घरात बसून राहिले अशा अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कार्यक्षम उपमुख्यमंत्री कळणार नाहीत, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांची ओळख घरबस्या मुख्यमंत्री (Chief Minister) अशी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

“सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा…”; दानवे-भुमरे बाचाबाचीवर आमदार संजय शिरसाटांची तिखट प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी शिवसेना (ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख मस्टर उपमुख्यमंत्री असा केला होता. या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

Nana Patole : “कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या…”; मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

यावेळी ते म्हणाले की, भाजपची (BJP) चिंता तुम्ही करु नका. तुमचे चिन्ह गेले, तुमचा पक्ष गेला, नेतृत्व राहिले नाही, तुमचे संविधान गेले, तुमचे आमदार गेले, तुमचे खासदार गेले त्यांची चिंता तुम्ही करा. त्यामुळे सातत्याने दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचे सोडा. आमच्या नेतृत्वावर तुम्ही बोलू नका, तुमचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा दाखवून निवडून आले होते. तुमचे सुपूत्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आले आहेत हे विसरु नका, असे शेलार यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची तब्बल १३६ दिवसांनंतर संसदेत दिमाखदार एन्ट्री; Video व्हायरल

तसेच हिंदू जनआक्रोश मोर्चावर केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, तुमचे जे पाकडयांवरचे प्रेम आहे ते जनतेसमोर मांडण्यासाठीच हे मोर्चे निघत आहेत. आपली औरंगजेबाप्रती असलेली निष्ठा हे उघड करण्यासाठी हे मोर्चे आहेत. हिंदू एकत्र आले की तुम्हाला त्रास का होतो, असा सवालही त्यांनी केला आहे? गेली पंधरा वर्षांची त्यांची भाषणे ऐकली तर याच्या छाताडावर बसू, त्याच्या छाताडावर बसू यापेक्षा वेगळे काय बोलतात? असा प्रश्नही शेलार केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या