Sunday, May 4, 2025
Homeराजकीयशेलार यांनी घेतली शरद पवारांची भेट

शेलार यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | Mumbai –

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून दिली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. Ashish Shelar meets Sharad Pawar

- Advertisement -

दरम्यान राज्यात एकीकडे करोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही विविध घडामोडींमुळे तापलेले आहे. त्यातच भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच घरवापसी करतील असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच शेलार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शादी डॉटकॉम बेवसाईटवरून पीडित महिलेशी संपर्क साधत, तिला लग्नाचे आमिष दाखविले. घर घेण्यासाठी तिच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेतले. केडगाव येथे...