Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याकॉंग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाणांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

कॉंग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाणांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | Mumbai

कॉंग्रेसला मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींनंतर आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या कॉंग्रेसच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून पत्रामध्ये याबाबतचा तपशील समोर आला आहे. त्यामध्ये अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीसोबतच काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा स्विकारल्याचे बोलले जात आहे. यानंतर काही वेळातच अशोक चव्हाण माध्यमांशी बोलतील असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार विश्वजीत कदम, अमर राजूरकर, राजू पारवे, विकास ठाकरे, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, सुभाष धोटे, अमित झनक, हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या