Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat : जादूटोण्याची भीती दाखवून १६ एकर जमीन हडपली

Ashok Kharat : जादूटोण्याची भीती दाखवून १६ एकर जमीन हडपली

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात शेतकर्‍याकडून तक्रार; ; २२ वर्षांनी तोडले मौन

- Advertisement -

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

दैवी शक्ती आणि जादूटोण्याची भीती दाखवून भोंदूबाबा अशोक खरात याने तालुक्यातील कुंदेवाडी येथील शेतकर्‍याची तब्बल १६.५० एकर जमीन फसवणुकीने हडपली आहे. तशी तक्रार तब्बल २२ वर्षांनंतर पीडित शेतकर्‍याने केल्यानंतर पोलीसांनी खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुंदेवाडी येथील एक शेतकरी व त्यांच्या भावांनी १९९७ साली मिरगाव शिवारात सुमारे १५ लाख रुपयांना जमीन खरेदी केली होती. २००३ मध्ये आरोपी अशोक खरात हा त्यांच्या शेतात येऊन मंत्रोच्चार, पूजाविधी करत विश्वास संपादन करू लागला. त्यानंतर ‘कुटुंबावर मोठे संकट येणार, जीवितहानी होऊ शकते’ अशी भीती दाखवत त्याने जमीन विकण्याचा सल्ला दिला. भीती आणि संमोहनाच्या प्रभावाखाली २००४ मध्ये फिर्यादीला कोणताही मोबदला न देता जमीन स्वतःच्या नावे करून घेतली.

जमिनीबाबत विचारणा केल्यावर खरात याने ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे, विरोध केल्यास जादूटोणा करून कुटुंबाचा नाश करीन’ अशी धमकी दिल्याचे पिडीत शेतकऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. खरात याचे मोठ्या राजकीय व प्रशासकीय व्यक्तींसोबत संबंध असल्याच्या भीतीने आम्ही दोन दशके गप्प बसल्याचे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आरोपीने इतर लोकांचीही फसवणूक केली असून काही महिलांचे शोषण केल्याच्या घटना समोर आल्यानंतर पिडीत कुटुंबाने भीती झुगारून पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२० (फसवणूक), कलम ५०६ (धमकी), नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...