Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या सहाव्या गुन्ह्यात...

Ashok Kharat Crime : अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या सहाव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजर करणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?

नाशिक | Nashik

स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला पुरुष भासवून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. आज (गुरुवारी) खरातला पाचव्या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Seassion Court) हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. तर सहाव्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भोंदू अशोक खरातला आज (गुरुवारी) न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता त्याला पाचव्या गुन्ह्यात ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याची रवानगी आता कारागृहात होणार आहे. तर सहाव्या गुन्ह्याच्या (Case) तपासासाठी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान, अशोक खरातची आज पाचव्या गुन्ह्यात रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटी पुन्हा खरातला सहाव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे. यानंतर उद्या (शुक्रवारी) त्याला सहाव्या गुन्ह्याच्या संदर्भात न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ...