Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमAshok Kharat News : खरातला शिर्डी पोलिसांकडून अटक; अवैध सावकारी व फसवणूक,...

Ashok Kharat News : खरातला शिर्डी पोलिसांकडून अटक; अवैध सावकारी व फसवणूक, पुन्हा पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संशयित भोंदूबाबा ऊर्फ कॅप्टन अशोककुमार खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात फसवणूक (Fraud) आणि अवैध सावकारीचा दहावा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असल्याने या गुन्ह्यात त्याला न्यायालयाच्या आदेशाने शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि. ४) त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) हजर केले असता तपासासाठी खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने विशेष तपास पथकाला दिले.

- Advertisement -

शिर्डी (Shirdi) येथील शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गोंदकर यांना कर्जाची गरज असताना खरातने त्यांना दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे दिले. या व्यवहारापोटी खरातने गोंदकर यांची शिर्डी व परिसरातील सुमारे चार एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदीखत करून घेतली. व्याजासह जास्तीची रक्कम परत करूनही खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि किरण नानासाहेब सोनवणे (रा. निमगाव, ता. राहता जि. अहिल्यानगर), अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी ता. राहता), अशोक परबत तांबे (रा. शिर्डी) या पाच संशयितांनी जमीन परत करण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम व भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा नोंद आहे. दरम्यान, खरात मागील ४८ दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. नवव्या गुन्ह्यात त्याला शुक्रवारी व्हीसीद्वारे हजर केले असता चार मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर सोमवारी (दि. ४) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी शिर्डी पोलिसांनी दहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातच्या ताब्याची मागणी केली होती. तेव्हा न्यायालयाने एसआयटीला खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना सोपवण्याचे आदेश दिले. खरातचा उजवा हात मानला जाणारा अरविंद बावके याला यापूर्वीच अटक (Arrested) झाली आहे.

कल्पना अद्याप पसार

या गुन्ह्यात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) ही सहसंशयित असून ती गेल्या तीन आठवड्यांपासून पसार आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत असतानाही ती अद्याप हाती लागलेली नाही. आतापर्यंत खरातवर दाखल असलेल्या नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटीने (SIT) केला आहे. या सर्व प्रकरणांत नेमके काय पुरावे मिळाले हे अद्याप स्पष्ट नसले तरी शिर्डी पोलिसांनी आता या नवीन गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा

Nashik News: उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम, धरणसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; जिल्ह्यात ‘इतक्या’ टँकरद्वारे...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा थेट परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर होताना दिसत आहे. तापमानाने ४० सेल्सिअसचा...