Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमShirdi : भोंदू खरातच्या पत्नीचा जामीनासाठी राहाता न्यायालयात अर्ज

Shirdi : भोंदू खरातच्या पत्नीचा जामीनासाठी राहाता न्यायालयात अर्ज

प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाच्या नावावर चार खात्यात कोट्यावधींचा व्यवहार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिने त्यांच्या वकिलामार्फत जामीन मिळण्याकरिता राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची सुनावणी आज शुक्रवारी राहाता न्यायालयात होणार असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या बरोबरच समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर व त्यांचा मुलगा यांच्या नावावर चार बँक अकाउंट खात्यात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती समोर येत असल्याने पोलीस त्यांना चौकशीसाठी आज नोटीस बजावण्याची शक्यता आहे. सिन्नर येथील जगदंबा पतसंस्थेची चौकशी आता नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून अशोक खरात याने संस्थान कर्मचारी विकास दिवटे यास मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भावाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्याची देखील चौकशी लवकरच होणार आहे.

- Advertisement -

अशा एक न अनेक या प्रकरणात वेगवेगळे गुंते वाढत चालल्याने पोलिसांना देखील या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भोंदूगिरी करून महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या अशोक खरात याच्यावर नागरिकांना धमकावून त्यांच्या जमिनी बळकावणे, व्याजाने पैसे देणे, महिलांना फसवून त्यांना जाळ्यात ओढणे, नागरिकांकडून पैसे लुबाडणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्याच्या वेगवेगळ्या कारनाम्याची चौकशी करत आहे. त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार असल्याने पोलीस तिचा शोध घेत असून कल्पना खरात हिला जामीन मिळण्याकरिता राहाता न्यायालयात तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला असून त्या अर्जाची सुनावणी आज शुक्रवारी राहाता न्यायालयात होणार असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच समता नागरी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात याने 57 व्यक्तींच्या नावावर जवळपास 100 खाती उघडले असून अशा बनावट बँक खाते असणार्‍या जवळपास 33 व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली आहे. प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाच्या नावावर समता पतसंस्थेत चार बँक अकाउंट आहे. त्यांना चौकशीसाठी पोलीस आज नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.

आम्ही कुठले प्रकारचे कागदपत्र दिले नाही व बँकेत येऊन व्यवहार केले नाही असे असताना देखील आमचे खाते उघडले गेले असे हे बँक अकाउंट आमचे नाही. तरीदेखील आमच्या खात्यावर कोट्यावधी रुपयाचे व्यवहार झाले, असे लेखी जबाब शिर्डी पोलिसांना चौकशी दरम्यान बँक अकाउंट असलेल्या खातेदारांनी दिले आहे. जगदंबा पतसंस्थेत देखील भोंदू अशोक खरात यांनी दुसर्‍या व्यक्तींच्या नावाची कागदपत्र देऊन बँक अकाउंट उघडले उघडल्याचे निष्पन्न झाले आहे बँकेचा देखील तपास आता नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते. साईबाबा संस्थानमध्ये सेवेत असलेले विकास दिवटे यांनी अशोक खरात यांच्या त्रासाल कंटाळून आत्महत्या केली, अशी फिर्याद त्यांच्या भावाने पोलिसात दिली असून या प्रकरणाची सबोल चौकशी व्हावी याकरिता राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याची देखील लवकरच सुनावणी लवकरच होणार असल्याचे समजते. एकंदरीत भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांच्या तपासात वेगवेगळे प्रकरणे बाहेर येत असल्याने त्याच्याबरोबर हित संबंध असलेल्या नागरिकांची धाबे दणाणले असून अनेक जण सध्या नॉट रिचेबल असल्याचे देखील निदर्शनास येत आहे.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...