Tuesday, April 29, 2025
Homeनगरअशोकनगर फाट्यावर दुचाकीची समोरासमोर धडक

अशोकनगर फाट्यावर दुचाकीची समोरासमोर धडक

वडाळा महादेव |वार्ताहर| Wadala Mahadev

दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात (Two Bike Accident) एकाचा मृत्यू (Death) झाला तर दोघे जण गंभीर जखमी (Injured) झाले. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील अशोकनगर फाटा (Ashoknagar Phata) येथे काल रविवार दि. 18 रोजी दुपारी 4 वा. ही घटना घडली.

- Advertisement -

अशोकनगर फाटा (Ashoknagar Phata) येथे बजाज कंपनीची मोटारसायकल (एमएच 17 बीआर 9725) व दुसरी हिरो होन्डा कंपनीची स्ट्रिट के फोर या विना नंबर असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक (Bike Accident) झाली. यामध्ये टाकळीभान (Takalibhan) येथील दोघे गंभीर जखमी झाले. रव मातापूर-निपाणी वडगाव शिवारातील दौंड नावाची व्यक्ती मयत झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा गुढ मृत्यू

दुचाकीस्वारांचा समोरासमोर अपघात (Bike Accident) झाल्याने जोराचा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदत कार्य करत घटनेची माहिती शहर पोलीस ठाणे (City Police Station) यांना तसेच 108 क्रमांक रुग्णवाहिका यांना कळविली. जखमींना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला लोणी (Loni) येथील पीएमटी रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. सदरच्या जखमीची परिस्थिती गंभीर असल्याने लोणी येथून पुणे (Pune) येथे उपचारासाठी नेण्याची तयारी सुरु असतानाच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. दौंड नावाची ही व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. वारंवार याच ठिकाणी अपघात (Accident) होत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

स्टंटबाजी करून श्रीरामपूरच्या पुढार्‍यांनी
तालुक्याचे वाटोळे केले- ना. विखेपाऊस लांबल्याने हवामान आधारीत चारा पिकांच्या लागवडीचे निर्देश

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मंत्रिमंडळ बैठकीसाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चोंडी (ता. जामखेड) या ठिकाणी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तयारी प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. येत्या 6 मे रोजी ही बैठक होणार असल्याचे प्रस्तावित...