Monday, June 24, 2024
Homeनगरअशोकनगर येथील मोहटादेवी मंदिरात धाडसी चोरी

अशोकनगर येथील मोहटादेवी मंदिरात धाडसी चोरी

वडाळा महादेव |वार्ताहर|Wadala Mahadev

- Advertisement -

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील अशोकनगर परिसरातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिरात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून सभागृहामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटीची साखळी तोडून ती पसार केली. काही अंतरावरच जावून दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेवून अज्ञात चोरटे पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सकाळी मंदिरातील मुख्य पुजारी बाबासाहेब विश्वनाथ ढाकणे (वय 56) हे नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता मंदिरातील साफसफाई तसेच लाईट बंद करण्यासाठी आले. त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा दिसून आला. तसेच मंदिरातील दानपेटी नेहमीच्या ठिकाणी नसल्याचे पाहताच ढाकणे यांनी आरडा ओरड केला. तात्काळ मंदिराचे अध्यक्ष भगवान डोंगरे, मदनराव कुंदे, अजित राऊत यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. यावेळी परिसरातील भाविक भक्त तसेच विश्वस्त यांनीही मंदिराकडे धाव घेतली. जमलेल्या नागरिकांनी परिसरात शोधाशोध केली असता दानपेटी शेजारच्या घासाच्या शेतात पडलेली असल्याचे दिसून आले.

काही नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. तात्काळ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, प्रवीण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पहाणी केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती देत श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक पाचारण करण्याची विनंती केली. घटनास्थळी अहमदनगर येथील श्वान पथक दाखल होवून परिसरात पाहणी केली. मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा असताना चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे.

यावेळी शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जीवन बोरसे, अहमदनगर येथील फिंगरप्रिंट, श्वान पथक एपीआय गणेश वडणगेकर, पीएसआय सोळुंके, पोलीस हवालदार संतोष परदेशी, रविंद्र गायकवाड, फोटोग्राफर श्री. खरपुडे, पो. ना. किरण टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, वसीम इनामदार, प्रवीण कांबळे, चालक इम्तियाज सय्यद, बाळासाहेब गिरी आदी उपस्थित होते. याप्रकरणी विश्वस्त बाबासाहेब विश्वनाथ ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अज्ञात

मंदिराच्या कळसावरील सीसीटीव्ही कॅमेरे हे खाली घेऊन मंदिर लगत असलेल्या ठिकाणी बसविण्यात यावे. सध्या कॅमेरे हे उंच कळसाभोवती असून यामध्ये पाटाच्या पलिकडील भाग दिसतो. परंतू जवळचा भाग दिसत नाही, त्यामुळे मंदिराच्या कळसावरील कॅमेरे खाली घेण्यात यावे.

– श्री. आंधळे, सामाजिक कार्यकर्ते

नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, तसेच चोर्‍यांचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिर व्यवस्थापन, दुकानदार, ग्रामस्थ यांनी सुरक्षा विषयी काळजी घ्यावी. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या आपत्कालीन ग्रामसुरक्षा प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी. यामध्ये परिसरातील साधारण दोन ते अडीच हजार नागरिकांना सहभागी करावे. यामुळे तात्काळ घटनेचा संदेश मोबाईलच्या माध्यमातून देण्यात येतो. मदतीसाठी शेकडो नागरिक धावून येतात. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. यामुळे नक्कीच चोर्‍यांचा प्रादुर्भाव कमी होऊन ग्रामस्थांनाही दिलासा मिळण्यास मदत होईल.

– हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या