अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची असणारी आठ गणपतीची मंदिरे होय. पेशवाईच्या काळापासून या गणपतीच्या आठ मंदिरांना आश्रय लाभल्यामुळे ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. म्हणून यांना अष्टविनायक असे म्हणतात. आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी श्रींची पूजा केली जाते. श्रींची पूजा म्हणजेच श्रीगणेशा केला जातो. श्रीगणेश ही विद्येची देवता आहेत. श्रीगणेश हे सुखकर्ता दु:खहर्ता व रक्षणकर्ता आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहेत.
महाराष्ट्रातील असंख्य भाविक या अष्टविनायकाची यात्रा करत असतात. सर्वसाधारणपणे दोन दिवसांत हा अष्टविनायकाचा प्रवास पूर्ण होतो. यावरून हे लक्षात येते की अंतराच्या दृष्टीने देखील हि मंदिरे जवळ आहेत. अष्टविनायक गणपती मंदिरातील विनायकाची मूर्ती महाड, सिद्धटेक, रांजणगाव या मूर्ती उजव्या सोंडेच्या आहेत तर इतर पाच ठिकाणच्या मूर्ती या डाव्या सोंडेच्या आहेत.
1) मोरेश्वर – मोरगावच्या मोरेश्वराला मयुरेश्वर असेही म्हटले जाते. कर्हा नदीकाठी वसलेले हे गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरेश्वर हे गणेशाचे आद्यपीठ आहे.
2) चिंतामणी – अष्टविनायकापैकी दुसरा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी आहे. कदंब वृक्षाखाली हे गणेशाचे मंदिर आहे. भक्तांची चिंता हरणारा हा चिंतामणी आहे. थेऊर हे ठिकाण पुणे सोलापूर महामार्गावर ती आहे.
3) सिद्धिविनायक – सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकातील तिसरा गणपती आहे. भीमा नदीवर वसलेले हे ठिकाण आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे.
4) महागणपती – अष्टविनायकातील चौथा गणपती रांजणगावचा महागणपती होय. पुणे जिल्ह्यातील हे गणपतीचे पवित्र ठिकाण आहे. अष्टविनायकातील सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीला मांडले जाते. महागणपतीने त्रिपुरासूररक्षणाचा वध केलेला होता. महागणपतीला दहा हात आहेत.
5) विघ्नेश्वर – अष्टविनायक गणपतीच्या रांगेतील ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते. विघ्नेश्वर गणपतीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावरती हिरा आहे. भक्तांच्या जीवनातील विघ्नांचे हरण करणारा म्हणून हा विघ्नेश्वर ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे. .
6) गिरीजात्मक – सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरीजात्मक आहे. कुकडी नदीच्या जवळपास असणारा डोंगरावर गिरीजात्मक गणेशाचे स्थान आहे. जुन्नरच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मक मंदिर आठव्या गुहेत असून तेथे जाण्यासाठी 367 पायर्या आहेत. एकाच दगडापासून हे मंदिर कोरले असून या मंदिराच्या दालनात एकही खांब नाही.
7) वरदविनायक – रायगड जिल्ह्यातील महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकापैकी सातवा गणपती आहे. भाविकांसाठी 24 तास खुले असणारे हे एकमेव गणेशाचे मंदिर आहे.
8) बल्लाळेश्वर – अष्टविनायकापैकी आठवा व शेवटचा गणपती पालीचा बल्लाळेश्वर आहे. अंबा नदीच्या परिसरात रायगडमधील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे. या मंदिरापासून जवळच उन्हेरेचे गरम पाण्याचे झरे आहेत.अष्टविनायक गणपतीची मंदिरे निसर्गरम्य वातावरणामध्ये स्थिरावलेली असल्याने अष्टविनायकाची यात्रा म्हणजे धार्मिक यात्रेबरोबरच एक नैसर्गिक पर्यावरण यात्रा सुद्धा ठरते