Monday, May 27, 2024
Homeनगरअश्वमेध अ‍ॅग्रोटेकचा कर्मचारी कंपनीच्या साडेतेरा लाख रुपयांच्या वस्तू घेऊन पसार

अश्वमेध अ‍ॅग्रोटेकचा कर्मचारी कंपनीच्या साडेतेरा लाख रुपयांच्या वस्तू घेऊन पसार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

अश्वमेध अ‍ॅग्रोटेक लि. कंपनीत नोकरीस असलेला विक्री प्रतिनिधी अजय प्रभाकर गंपावार रा. बी.के.नगर, नागपूर हा

- Advertisement -

कंपनीची होंडा कार व लिनीओ कंपनीचा लॅपटॉप असा 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन पसार झाला आहे.

फिर्यादी डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची अश्वमेध अ‍ॅग्रो केमिकल्स नावाची कंपनी गोकुळनगरी कॉम्प्लेक्स येथे आहे. त्यांच्या कंपनीत निर्माण झालेला माल विक्रीसाठी त्यांनी अनेक विक्री प्रतिनिधी नेमलेले आहेत. त्यांच्या ताब्यात कंपनीचा माल विक्रीसाठी विविध जिल्ह्यांत विक्री प्रतिनिधी नेमलेले आहेत.

ते कंपनीचा माल इतरत्र पोहोचवत असतात व त्याची रक्कम हिशेब करून आणून देत असतात. त्यातील एक आरोपी प्रतिनिधी अजय गंपावार हा नागपूर येथील बी.के.नगर येथील राहिवाशी आहे. मार्च 2020 पासून त्याच्या ताब्यातील कंपनीच्या 13 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या वस्तू त्यात एक लिनिओ कंपनीचा लॅपटॉप, एमएच- 17 – बी.एक्स.2177 होंडा कंपनीची कार, मोबाईल असे त्यास कंपनीने काढून टाकल्यानंतर कंपनीस परत न करता स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन गेला आहे.

तसेच कंपनीचे विक्री प्रतिनिधीचे सेल्स अ‍ॅग्रीमेंट संदर्भातील व आरोपीस दिलेल्या नेमणुकीची कागदपत्रे असलेली कागदपत्रांची ऑफिसमध्ये ठेवलेली फाईल चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अश्वमेध अ‍ॅग्रोटेकचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या