Saturday, May 25, 2024
Homeनगरआश्वी खुर्दचे ग्रामपंचायत सदस्याचे अपघाती निधन

आश्वी खुर्दचे ग्रामपंचायत सदस्याचे अपघाती निधन

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय 27) यांचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हे राहाता येथील बंधन बँकेत नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे सोमवारी ते कामावर गेले होते. सायंकाळी अंदाजे 8 ते 9 च्या दरम्यान राहात्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होते.

- Advertisement -

याचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणार्‍या वाहनाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिंप्री-लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आश्वी खुर्द येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या