Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याचिंचवडचा गड भाजपने राखला; अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

चिंचवडचा गड भाजपने राखला; अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

मुंबई | Mumbai

- Advertisement -

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba-Chinchwad by-Election) निकाल जाहीर झाला आहे. कसबा मतदारसंघातून माविआच्या उमेदवारांने बाजी मारली आहे. याठिकाणाहून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

दहावीच्या परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; गॅस टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा धक्का बसला असून भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी ३६ हजार ९१ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव केला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना ४४ हजार ११२ मते मिळाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सहाय्यक निबंधकास पंधरा हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

दरम्यान, आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. यानंतर मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या