दुबई | वृत्तसंस्था Dubai
दुबई इंटरनॅॅशनल स्टेडियमवर आज आशिया चषक २०२२ चा क्रिकेटचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. यात श्रीलंकेच्या संघाने विजय मिळविला.
श्रीलंकेच्या संघाने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून सलामीला रोहित शर्मा व के.एल.राहुल फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच महेश थिकसानाच्या गोलंदाजीवर के.एल.राहुल पायचीत झाला. के.एल.राहुलने ७ चेंडूत ६ धावा केल्या. दिलशान मधुशंकाने विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत शून्यावर माघारी पाठविले. अकराव्या षटकाअखेर भारतीय संघाची धावसंख्या ९१ धावा २ गडी बाद अशी होती.
सलामीला आलेल्या रोहित शर्माने ४१ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार लगावत भारतीय संघाकडून सर्वाधिक ७१ धावा केल्या. चामिका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर पथुम निसांकाने रोहित शर्माला झेल बाद केले. सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३४ धावा केल्या. महेश थिकसानाने सुर्यकुमार यादवला झेल बाद केले. दसून शनाकाच्या गोलंदाजीवर पथुम निसांकाने हार्दिक पंड्याला झेल बाद केले. हार्दिकने १३ चेंडूत १७ धावा केल्या. दिलशान मधुशंकाने हार्दिक पंद्याला अवघ्या ३ धावांवर क्लीन बोल्ड केले.रिषभ पंत ने १७ धावांचे योगदान देत निसांका कडून झेल बाद झाला.
२० व्या षटकाअखेरीस भारतीय संघाने ८ गडी बाद १७३ धावा केल्या. तर श्रीलंकेच्या संघाला १७४ धावांचे आव्हान दिले.
श्रीलंकेच्या संघाकडून सलामीला पथुम निसांका व कुसल मेंडिस फलंदाजीस आले. पथुम निसांकाला रोहित शर्माने ५२ धावांवर झेल बाद केले तर चरिथ असलंकाला सूर्यकुमार यादवने झेल बाद करत शून्यावर माघारी पाठविले. के एल राहुल ने दानुष्का गुनाथिलका अवघ्या १ धावसंख्येवर झेल बाद केले.सलामीला आलेल्या कुसल मेंडिसने ३७ चेंडूत ५७ धावा केल्या. युजवेन्द्र चहलच्या गोलंदाजीवर कुसल मेंडिस पायचीत झाला.१५ व्या षटका अखेरीस ४ गडी बाद १२० धावा श्रीलंकेच्या संघाच्या झाल्या. भानुका राजपक्षे व दसून शनाका यांच्या जोडीने दमदार फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला विजय प्राप्त करून दिला.