Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023 च्या तारखा जाहीर; भारत-पाकिस्तान भिडणार, किती सामने होणार?

Asia Cup 2023 च्या तारखा जाहीर; भारत-पाकिस्तान भिडणार, किती सामने होणार?

मुंबई | Mumbai

क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमींना वाट पाहायला लावणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) होय. भारताचा ज्यावेळेस पाकिस्तानसोबत सामना असतो त्यावेळेस क्रिकेट चाहते आपले हातचे काम सोडून सामना पाहत बसतात. अशातच आता पुन्हा एकदा चाहत्यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पहावयास मिळणार आहे…

- Advertisement -

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी

नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( Pakistan Cricket Board) आशिया वर्ल्ड कप २०२३ (Asia World Cup 2023) च्या तारखा जाहीर केल्या असून या स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. आशिया वर्ल्ड कप ही स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवली जाणार आहे.

तसेच आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामने रंगण्याची शक्यता आहे. तर साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. त्यानंतर सुपर- ४ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येतील. जर सुपर ४ मध्ये दोन्ही संघांनी गुणतालिकेत आघाडीवर स्थान पटकावले तर आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता आहे.

Video : कागदावर कुंकवाच्या पाऊलखुणा; चिमुकल्यांचं शाळेत अनोखं स्वागत

दरम्यान, यावर्षी आशिया कप स्पर्धा एकदिवसीय स्वरुपात खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तान, नेपाळ हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे आहेत. तसेच यामध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शाळा गजबजल्या, चिमुकल्यांचे जंगी स्वागत; पाहा व्हिडीओ

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या