Wednesday, January 7, 2026
HomeUncategorizedAsia Cup 2025 Update: भारतीय क्रिकेट संघाची आशिया चषक स्पर्धेतून माघारीची शक्यता;...

Asia Cup 2025 Update: भारतीय क्रिकेट संघाची आशिया चषक स्पर्धेतून माघारीची शक्यता; BCCI लवकरच घोषणा करण्याची शक्यता, काय आहे कारण?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषदेच्या सर्व स्पर्धांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आपला निर्णय एसीसीला कळवला आहे. एका वृत्तानूसार टीम इंडिया आगामी आशिया चषक (Asia Cup 2025) खेळणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेला यासंदर्भात कळविले आहे. येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होत असलेल्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि पुरुषांचा आशिया कप २०२५ मधून भारतीय संघाचे नाव मागे घेत असल्याचे बीसीसीआयने एसीसीला कळविले आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी हे पीसीबीचे अध्यक्ष असून ते आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का देण्यात आला आहे.

- Advertisement -

बीसीसीआयच्या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणारी आशिया चषक स्पर्धेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कपमध्ये खेळतात. कदाचित ही स्पर्धा रद्द देखील होऊ शकते. कारण भारतीय संघाशिवाय ही स्पर्धा खेळवणे व्यवहार्य ठरणार नाही. कारण अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे बहुतेक प्रायोजक हे भारतातील आहेत. तसेच भारत-पाकिस्तान सामन्यांशिवाय प्रसारकांनाही या स्पर्धेत फारसा रस नसेल. आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामन्याकडे जगभराचे लक्ष लागलेले असते.

YouTube video player

एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. हा निर्णय भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ”भारतीय संघ एसीसीने आयोजित केलेल्या आणि पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत खेळू शकत नाही. ही देशाची भावना आहे. आम्ही आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील आमचा सहभागही थांबवण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या सुत्राने म्हटले आहे.

स्पर्धा एकदिवसीय आणि ट्वेंटी- 20 या दोन्ही स्वरूपात खेळवली जाते. भारत हा आशिया चषकातील सर्वाधिक यशस्वी संघ आहे, भारताने एकूण ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंका ६ वेळा आणि पाकिस्तान २ वेळा विजेतेपद मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...