Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण, रोईंगमध्ये दोन...

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण, रोईंगमध्ये दोन कांस्यपदक

दिल्ली | Delhi

चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (Asian Games) भारताने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं (gold medal) खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) भारताची सुरुवात चांगली झाली आहे.

- Advertisement -

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. रुद्रांश पाटील, (Rudransh Patil) ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पवार यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धा जिंकून भारताला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तर रोईंगच्या पुरुष जोडी-4 मध्ये भारताला कांस्यपदक मिळाले. आता भारताच्या खात्यात 7 पदके झाली आहेत. रोइंगमध्ये भारताची आता 4 पदके झाली आहेत. ज्यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.

“अर्थखातं टिकेल की नाही, हे सांगता येत नाही”; अजित पवारांचे भुवया उंचावणारे विधान

दरम्यान, गेल्या वर्षी इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने सुवर्ण पदक जिंकले होतं. या कामगिरीमुळे जागतिक शुटर ऑफ द इअरसह गोल्डन टारगेटचा पहिला भारतीय मानकरी रुद्रांक्ष ठरला होता. त्याला या स्पर्धेत 15000 डॉलरचे म्हणजे जवळपास 12 लाख भारतीय रुपये बक्षीस मिळाले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

भारताच्या खात्यात आतापर्यंत सात पदकं

  • मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता जिंदल : 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी): रौप्यपदक

  • अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह, मेन्स लाईटवेट डबल स्कल्स (रोईंग): रौप्यपदक

  • बाबू लाल आणि लेख राम, मेन्स कॉक्सलेस डबल्स : (रोईंग) : कांस्यपदक

  • मेन्स कॉक्स्ड 8 टीम : (रोईंग) : सिल्वर

  • रमिता जिंदल-वूमन्स 10 मीटर एयर रायफल (शुटिंग) : कांस्यपदक

  • ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पंवार, 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी) : सुवर्णपदक

  • आशीष, भीम सिंह, जसविंदर सिंह आणि पुनित कुमार-मेन्स कॉक्सलेस 4 (रोईंग) : कांस्यपदक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या