Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 मध्ये टीम इंडियाचा बोलबाला! सिंगापूरवर 16-1 ने शानदार विजय

Asian Games 2023 मध्ये टीम इंडियाचा बोलबाला! सिंगापूरवर 16-1 ने शानदार विजय

दिल्ली | Delhi

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय (Asian Games 2023) खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाचाही कमाई केली. त्यानंतर आता पुन्हा गुडन्यूज मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) विजयी वाटचाल कायम ठेवत सिंगापूरचाही (Singapore) दणदणीत पराभव केला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉकी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत १६ गोल केले.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी सिंगापूरला फक्त १ गोल करता आला. भारताने याआधीच्या उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही असाच पराक्रम केला होता. या सामन्यात १६ गोल करत विजय मिळवला होता. त्यानंतर आता सिंगापुरलाही तडाखा दिला. जागतिक क्रमवारीत सिंगापूर ४९व्या स्थानावर असलेल्या आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासोबत हा सामना झाला. भारताला आता गतविजेत्या जपानशी २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूल ए च्या पुढील साखळी सामन्यात खेळायचे आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) याने ४ गोल केले. तर मनदीप सिंग (Mandeep Singh) याने हॅट्रिक केली. पहिल्या क्वार्टरमध्ये निराशाजनक प्रदर्शनानंतर भारतीय संघाने पूर्ण ताकद लावली आणि हाफ टाईमपर्यंत सिंगापूरवरील आघाडी ६-० अशी केली. मनदीपने दोन गोल केले, तर ललित, गुरजंत, सुमित आणि विवेक यांनीही प्रत्येकी १ गोल केले. दुसऱ्या हाफमध्ये भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्येच आणखी ५ गोल करत आपला इरादा स्पष्ट केला.

शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; बेलापूरातील घटना

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या