Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला...

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

नवी दिल्ली | New Delhi

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (19th Asian Games) भारताची पदाकांची लयलुट सुरुच असून भारताच्या खात्यात आतापर्यंत ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदकांसह एकूण १८ पदकांची भर पडली आहे. नुकतेच भारताची नेमबाज सिफ्ट कौर सामराने (Shooter Sift Kaur Samra) ५० मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तर नेमबाज आशी चौक्सीने कांस्यपदक मिळवले आहे…

- Advertisement -

Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

भारताची नेमबाज सिफ्ट कौर सामराने ५० मीटर रायफल इव्हेंटमध्ये भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. तर ४४१.९ गुणांसह चीनच्या क्युंगो झांगने दुसरे आणि ४३७.८ गुणांसह भारताच्या आशी चौकसीने (Ashi Chouksey) तिसरे स्थान पटकावले. याआधी नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला (Gold medal) गवसणी घातली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कांदाप्रश्न सोडविण्यासाठी २९ सप्टेंबरला दिल्लीत बैठक

- Advertisment -

ताज्या बातम्या