Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : भारतीय महिला संघाची 'सुवर्ण' कामगिरी; श्रीलंकेचा १९ धावांनी...

Asian Games 2023 : भारतीय महिला संघाची ‘सुवर्ण’ कामगिरी; श्रीलंकेचा १९ धावांनी केला पराभव

नवी दिल्ली | New Delhi

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (19th Asian Games) अंतिम फेरीत आज भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women’s Cricket Team) श्रीलंकेचा (Sri Lanka) पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. तर श्रीलंकेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. २०२३ च्या आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक असून यापूर्वी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते…

- Advertisement -

Nashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

भारताने सुवर्ण पदकाच्या (Gold Medal) अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना ११६ धावांपर्यंत मजल मारली होती. यात स्मृती मंधानाने ४५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ४० चेंडूत ४२ धावा केल्या ज्यात तिने ५ चौकार मारले. या दोघांशिवाय दुसरी कोणतीही खेळाडू आपली छाप सोडू शकली नाही. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत आठ गडी गमावून ९७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताने हा सामना १९ धावांनी जिंकला.

Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

तर भारताने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करतांना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. भारताकडून तितास साधू (Titas Sadhu) हिने भेदक मारा करत चार षटकांत अवघ्या सहा धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना (Batsmen) तंबूत पाठविले.तिने तिसऱ्या षटकात अनुष्का संजीवनी हिला एका धावेवर तर विशमी गुणरत्ने हिला शून्यावर तंबूत धाडले. यानंतर कर्णधार चमारी अटापट्टूही तितासा साधूच्या चेंडूवर बाद झाली. चमारी अटापट्टू हिने १२ धावांचे योगदान दिले.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

त्यानंतर डिसिल्वा आणि परेरा यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. परेरा २५ तर डिसिल्वाने २३ धावांची खेळी केली. परेराला राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gaikwad) तंबूत पाठवले. तर डिसल्वाचा अडथळा पूजा वस्त्राकर हिने दूर केला. तर ओशादी रणसिंघे हिला १९ धावांवर दिप्ती शर्माने तंबूत पाठविले. त्यामुळे श्रीलंकेला भारत पराभूत करू शकला. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे दिवसातील हे दुसरे सुवर्णपदक होय.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : “आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही”; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या