Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाAsian Games : आशियाई स्पर्धेत मुलींनी मारली बाजी! एअर पिस्टल शूटिंगमध्ये मिळवलं...

Asian Games : आशियाई स्पर्धेत मुलींनी मारली बाजी! एअर पिस्टल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड अन् सिल्व्हर मेडल

दिल्ली | Delhi

भारतीय खेळाडू चीन येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील वेगवेगळ्या खेळांमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. महिलांच्या टीमने सांघिक क्रीडाप्रकारात रौप्य पदक मिळवल्यानंतर, वैयक्तिक स्पर्धेमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.

- Advertisement -

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल (Shooting 10m Air Pistol Women) प्रकारात भारताच्या नेमबाजीमध्ये (Shooting) पलकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर, ईशा सिंगने रौप्यपदक पटकावलं आहे. भारताचं हे आठवं सुवर्ण पदक आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 30 पदकांची कमाई केली आहे. भारताला 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकही मिळालं आहे.

माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण…

17 वर्षांच्या पलकचे सुवर्णपदक पटकावलं. तर 18 वर्षीय ईशा सिंगने रौप्य पदक जिंकलं. यामुळे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्णपदक आणि रौप्यपदक दोन्ही मिळाले आहेत. पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत 242.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर ईशा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. यासोबतच पाकिस्तानी खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

आशियाई क्रीडा स्पर्धेत ईशा सिंगने 2023 च्या भारतासाठी चार पदके जिंकली आहेत. ईशाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. यापूर्वी हैदराबादच्या रहिवासी 18 वर्षीय ईशाने 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताने दमदार सुरुवात केली आहे. नेमबाजांनी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. यासोबतच नेमबाजीतच दोन रौप्यपदकेही पटकावली आहेत. मात्र, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीचा पराभव झाला. भारताच्या नावावर आतापर्यंतच्या खेळांमध्ये 8 सुवर्णांसह एकूण 30 पदके आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या