Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयAsim Sarode : सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका, कारण…; असीम सरोदेंचा...

Asim Sarode : सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका, कारण…; असीम सरोदेंचा गंभीर आरोप

पुणे । Pune

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर वादाला आता नवे वळण मिळाले आहे.

- Advertisement -

पुण्यात उपचार घेत असलेल्या राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. या हल्ल्यामागे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा गंभीर आरोप खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी केल्यानंतर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही धस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

YouTube video player

पुण्यात पत्रकारांशी बोलताना असीम सरोदे यांनी धक्कादायक माहिती दिली. “राम खाडे यांनी स्वतः मला सांगितले होते की, ज्याप्रमाणे माझ्यावर हल्ला झाला, तसाच माझ्या जीवितालाही धोका आहे,” असे सरोदे म्हणाले. राम खाडे यांच्याशी आपले पंधरा दिवसांपूर्वी संभाषण झाले होते. त्यावेळी त्यांना ‘जीवाला जपून काम करा,’ असा सल्ला दिला होता. परंतु, ‘माझ्यासोबत लोक आहेत, मी काळजी घेत काम करत आहे,’ असे उत्तर खाडे यांनी दिले होते. यानंतरही त्यांच्यावर हल्ला होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाची विशेष चौकशी समिती (SIT) नेमून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.

आमदार सुरेश धस यांच्यावर हा गंभीर आरोप होण्यामागे इनाम जमीन घोटाळ्याची पार्श्वभूमी आहे. राम खाडे यांनीच सर्वप्रथम धस यांच्यावर आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सुमारे २०० हेक्टर जमिनी हडपून ₹१००० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यासंबंधीची कायदेशीर बाजू असीम सरोदे यांच्याकडे होती.

सरोदे यांनी वारंवार आरोप केला आहे की, भोगवटा वर्ग-२ (Occupancy Class-2) च्या या इनाम जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची एक मोठी साखळी कार्यरत आहे. सेवा कार्यासाठी असलेल्या वक्फ आणि मंदिर ट्रस्टच्या इनाम जमिनींवर आधी दुसऱ्यांची नावे चढवायची आणि नंतर त्या आपल्या नावावर करून घ्यायच्या, हे सुरेश धस यांचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

राम खाडे यांच्या जीविताला धोका असल्याची कल्पना असूनही गृह विभागाने त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतल्याचा धक्कादायक खुलासा सरोदे यांनी केला. ते म्हणाले की, राम खाडे हे अनेक वर्षांपासून शासनातील घोटाळ्यांचा पर्दाफाश करत आहेत. मध्यंतरी त्यांनी आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या व कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.

यामुळे, खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. न्यायालयाने देखील त्यांना पोलीस सुरक्षा दिली होती. “तरीही गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली, याची माहिती नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे,” असे मत सरोदे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...