धुळे – Dhule – प्रतिनिधी :
हॅलो… मी बँकेतून बोलता, हा व्हेरीफिकेशन कॉल आहे, आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी द्या, असे सांगत एकाने देवपूरातील तरूणीसह तिच्या आईच्या फिक्स डिपोझिट व बँक खात्यातून तब्बल 8 लाख 44 हजारांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील दिपक शर्मा नामक व्यक्तीविरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रिती बाबुलाल कोठावदे (वय 23 रा. प्लॉट न. 42, आदर्श कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे) या तरूणीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या मोबाईल क्रमांकावर दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला.
बँकेतून दीपक शर्मा बोलत असून हा व्हेरीफिकेशन कॉल असल्याचे सांगत बँक खात्याबाबत माहिती विचारली. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीचीपी माहिती विचारून अॅक्सीस बँकेच्या तरूणीच्या आईच्या नावे असलेल्या फिक्स डिपॉझिट केलेल्या रक्कमेतून व बचत बँक खात्यातील शिल्लक रक्कमेतून एकुण 8 लाख 40 हजार रूपये काढून घेतले.
आपली फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रिती कोठावदे हिने पश्चिम देवपूर पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सिमकार्ड धारक दीपक शर्मा (पुर्ण नाव गाव माहिीत नाही) रा. बांद्रा, मुंंबई याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक गोराडे करीत आहेत.