Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रमैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर भरदिवसा कोयत्याने हल्ला

मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर भरदिवसा कोयत्याने हल्ला

पुणे | Pune

- Advertisement -

प्रेम (Love) प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एका विद्यार्थ्यावर (Student) कोयत्याने हल्ला (Attack) करण्यात आला आहे. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे…

पुण्यातील एका मराठी विद्यालयात प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला असून तो त्यात गंभीर जखमी झाला आहे. अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे.

किरकोळ कारणावरून डिलिव्हरी बॉयचा निर्घुण खून

जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्याच्यावर हल्ला झाला आहे, तो पद्मवती या भागात राहायला असून तो 12 वीत शिकत आहे. ज्याने हल्ला केला तो तुळशीबागेत काम करतो.

झिंगाट महिलेचा विमानात धिंगाणा; कपडे काढून क्रू मेंबरला मारहाण

हल्ला झालेला मुलगा आरोपी मुलाच्या मैत्रिणीशी बोलत बस स्टॉपवर बसला होता. याचा राग आल्याने त्याने संबंधित विद्यार्थ्यावर कोयता उगारला आणि या हल्ल्यात त्याच्या शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील हा कोयता लागला. या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या