Monday, May 19, 2025
Homeधुळेधुळ्यात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला

धुळ्यात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील वडजाई रोड परिसरात कर्जाचा थकीत हप्ता (Arrears of loan installments) घेण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या (finance company) व्यवस्थापकावर (manager) जिवघेणा हल्ला (fatal attack) करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी (seriously injured) झाले असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा (crime against both) नोंद झाला आहे.

याबाबत बजाज फायनान्स कंपनीचे मॅनेजर निलेश कैलास चौधरी (वय 23 रा. पंचवटी, गल्ली नं. 8, देवपूर) याने चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते रविवारी सायंकाळी वडजाई रोडवरील अबरारी मशिदजवळ असलेल्या मलिका उस्मान खाटीक यांच्याकडे कंपनीचे थकीत कर्जाचे हप्ते मागण्यासाठी गेले होते.

त्याचा राग येवून मलिका उस्मान खाटीक हिच्यासह तिच्या मुलाने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व छातीवर मारहाण केली. तसेच मटण कापण्याचा सुर्‍याने उजव्या हातावर मारून गंभीर दुखापत केली. त्यानुसार महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : पेठ उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव मंजूर

0
पेठ | प्रतिनिधी | Peth पेठ नगरपंचायतीच्या (Peth Nagarpanchyat) उपनगराध्यक्षा अफरोजा शेख यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव (No Confidence Motion) मंजूर झाल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले...