Monday, March 31, 2025
Homeधुळेतरूणावर प्राणघातक हल्ला ; दोघांवर गुन्हा दाखल

तरूणावर प्राणघातक हल्ला ; दोघांवर गुन्हा दाखल

धुळे । प्रतिनिधी dhule

वाहनाची हुलकावणी देण्याच्या कारणावरून तरूणावर कोयता व चाकुने हल्ला केल्याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत परेश रविंद्र बडगुजर (वय 29 रा. बोराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परेश यांचा मित्र निलेश गोपीचंद बेडीस्कर यास वाहनाची हुलकावणी दिल्याच्या कारणावरून दि. 15 जुलै रोजी दुपारी एक वाजता बोराडी गावात कुणाल सुभाष नाईक व अनिकेत सुभाष उर्फ नाना कोळी हे दोघे जण विनानंबरच्या शाईन मोटार सायकलीवर आले. व त्यांनी परेश यांच्या उजव्या कानाच्या बाजुला वार केला. तसेच अनिकेत याने देखील हाताच्या मनगटावर चाकुने वार करून जखमी केले. त्यांच्या फिर्यादीवरून भादंवि 307, 504, 34 व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्यात म्हाडा वर्षभरात १९ हजार ४९७ घरे ...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात (Budget) 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक...