पुणे | Pune
राज्यात पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकासआघाडी आणि महायुतीमधील पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) काँग्रेसचे निरीक्षक आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे देखील हजर होते.
हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस पक्षाने खोसकर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांच्या अडचणी वाढल्या असून ते उमेदवारी मिळावी यासाठी विविध पक्षांची चाचपणी करत आहे. मात्र, काँग्रेसकडूनच (Congress) आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता खोसकर प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) खोसकर यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा
यावेळी माध्यमांशी बोलतांना आमदार खोसकर म्हणाले की, “माझ्यावर करण्यात आलेला क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा असल्याचे शरद पवारांना सांगितले. मला काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची शरद पवारांना विनंती केली. तसेच पहिल्या यादीत मला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर न झाल्यास माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत”, असे म्हणत खोसकरांनी एकप्रकारे काँग्रेसला इशारा देत पक्षांतराचे संकेत दिले आहेत.
हे देखील वाचा : वाशिमच्या सभेतून PM मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर घणाघात; म्हणाले…
दरम्यान, याआधी देखील आमदार हिरामण खोसकरांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी खोसकर यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आल्याचे बोलले गेले होते. मात्र, खोसकरांनी त्याला नकार दिला होता. यानंतर आज पुन्हा एकदा आमदार खोसकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा