Saturday, November 2, 2024
HomeनगरAssembly Election 2024 : प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार गुन्हे दाखल

Assembly Election 2024 : प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांवर होणार गुन्हे दाखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र कर्मचार्‍यांचे 27 ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. या सर्व कर्मचार्‍यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली. यावेळी प्रथम प्रशिक्षणास अनावश्यकपणे दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंदविणे अथवा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदी नुसार करवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिले आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान केंद्रासाठी नियुक्त अधिकारी- कर्मचार्‍यांची दुसरी सरमिसळ जिल्हाधिकारी सालीमठ आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सरमिसळ प्रक्रियेस निवडणूक निरीक्षक ताई के, हौलीनलाल गौईटे, अरुण कुमार, डी. रथ्ना, कविथा रामू, श्रीमती रंजीता, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जी. एन. नकासकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाकरिता होणार्‍या मतदानासाठी मतदान केंद्र कर्मचार्‍यांचे 27 ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. या सर्व कर्मचार्‍यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. प्रथम प्रशिक्षणास अनावश्यकपणे अनुपस्थित कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंदविणे अथवा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदी नुसार करवाई करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश दिले आहेत.

मनुष्यबळाच्या सरमिसळ प्रक्रियेबाबत मतदान पथक निश्‍चित करण्यात आले. तसेच प्रत्येक मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा दहा टक्के अधिक पथकांसाठी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. या पथकांना 18 नोव्हेंबर रोजी होणार्‍या प्रशिक्षणाच्या वेळी तिसर्‍या सरमिसळ प्रक्रियेद्वारे मतदान केंद्र निश्‍चित करून देण्यात येतील.

मनुष्यबळाची सरमिसळ करून कर्जत मतदासंघांसाठी 396, श्रीगोंदा 383, अहमदनगर शहर 330, पारनेर 407, राहुरी 343, शेवगाव 410, कोपरगाव 303, नेवासा 307, संगमनेर 321, शिर्डी 304, श्रीरामपूर 346 आणि अकोले मतदासंघांसाठी 342 पथके निश्‍चित करण्यात आली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे नकासकर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या