Thursday, January 8, 2026
HomeनाशिकAssembly Election 2024 : नांदगाव मतदारसंघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू; जिल्हा...

Assembly Election 2024 : नांदगाव मतदारसंघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू; जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) सार्वत्रिक निवडणुकीत ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) आज मतदानाच्या (Voting) वेळेस दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -

नांदगाव शहरात (Nandgaon City) गुरुकृपा महाविद्यालयाजवळ आज सकाळी काही मतदारांची एकाच ठिकाणी गर्दी झाली होती. यावरून दोन उमेदवारांमध्ये झालेल्या शा‍ब्दिक चकमकीप्रकरणी गुन्हा (Case) नोंदविण्यात येत आहे. तसेच बाहेरील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. साकोरे गावात घडलेल्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिस बळाचा सौम्य वापर करण्यात आला आहे.

YouTube video player

नांदगाव मतदारसंघात मतदानाची (Voting) प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. नांदगाव मतदारसंघातील घटनांवर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....