Friday, April 25, 2025
HomeराजकीयSharad Pawar : 'त्यांना' साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं; शरद पवारांचा एल्गार

Sharad Pawar : ‘त्यांना’ साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं; शरद पवारांचा एल्गार

टेंभुर्णी । Tembhurni

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांवर फैरी झाडल्या जात आहेत. आपला पक्ष, उमेदवार जिंकावा यासाठी सर्वांकडून जोमाने प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

यादरम्यान सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत. माढा आणि करमाळामधील शिंदे बंधूंना पाडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यासोबत आपला नाद करायचा नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला आहे.

शरद पवार म्हणाले की, पक्ष फाटाफुटीत काळात आमची जवळची विश्वासू माणसं लांब गेली पण अभिजित पाटील यांनी येऊन सांगितले की कोणी कुठे ही जावो पण मी तुमची साथ सोडणार नाही. पण हा आमचा माढ्यातील गडी कुठं पळून गेला कळलंच नाही. नंतर समजले की ईडीच्या भितीने तो गेला. मलाही ईडीची नोटीस आली होती. पण मी कुठं पळून गेलो का. मी थेट ईडीच्या ऑफीसकडे जायला निघालो त्यावेळी ईडीच्या अधिकारी ऑफिसकडे येऊ नका असे म्हणत मला हात जोडतात आणि आमचा हा गडी ईडीची नोटीस मिळताच कुठे पळून गेला याचा पत्ता सुद्धा लागला नाही. संकटाला तोंड देण्याची हिम्मत यांच्यामध्ये नाही.ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांना कोणाच्या बापाची भीती नसते, अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

पुढे शरद पवार म्हणाले की, माढा तालुक्यात ज्यांना इतके दिवस साथ दिली त्यांच काय करायचं. एकदा रस्ता चुकलेल्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. उद्याच्या निवडणुकीत साधंसुध पाडायचं नाही जोरात पाडायचे याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे. सगळ्यांचा नाद करायचा पण असे म्हणताच उपस्थित जनसमुदायातून आवाज आला पवार साहेबांचा नाय!.

तसेच हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे १६००० कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले. २ वर्षात महाराष्ट्रात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील ६४ हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही असेही पवार म्हणाले. तसेच ६२ लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. असही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...