Friday, November 22, 2024
Homeनगरविना परवानगी जाहिरातबाजी करणार्‍या 24 जणांना नोटिसा

विना परवानगी जाहिरातबाजी करणार्‍या 24 जणांना नोटिसा

सोशल मीडियावरील 75 जाहिरातींना परवानगी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियाचा तरूण पिढीकडून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रमुख उमदेवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी स्वतः ची यंत्रणा उभारली आहे. गावातील आणि वॉर्डातील कार्यकर्त्यांमार्फत प्रचार केला जात आहे. सोशल मीडियावरील जाहिरातींसाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण कक्षाकडून 75 जाहिरातींसाठी परवानगी घेण्यात आली आहे. विना परवानगी जाहिरातबाजी केल्याबद्दल 24 जणांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियाव्दारे थेट मतदारांशी तत्काळ संपर्क होत आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवारांचे कार्यकर्ते व्हिडीओ, फोटो पोस्ट करत आहेत. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सोशल मीडियावरील जाहिरातींवर लक्ष ठेवण्याचे काम जिल्हा माध्यम संनियंत्रण कक्षाला दिले आहे. सोशल मीडियाच्या विविध ग्रुपची पडताळणी केली जात आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच उमेदवारांकडून प्रसिध्द केल्या जाणार्‍या जाहिरातींचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जात आहे.

राजकीय पक्ष, उमेदवारांना कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी माध्यम संनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना स्वतःची जाहिरात वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर प्रसारीत करण्यासाठी जाहिरातीची पूर्वपरवानगी बंधनकारक घेणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी, 12 मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पत्रकार यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या